१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

नाविका पल्याड ने रे मला !

मुलगी :
"बघ दिवस बुडू लागला
नाविका, पल्याड ने रे मला."

नाविक :
"दे मोल मला रोकडे
नेईन तुला पलिकडे
मी क्षणात लंघुनि जला
पंखावर नेईन फुला !"

मुलगी :
"कमळाची फुलली दले
बघ डोळे माझे निळे
चंद्राची चवथी कला
जग सगळे म्हणते मला."

नाविक :
काळे की डोळे निळे
ते मला न काही कळे
दे दाम रोकडा भला
मी पल्याड नेईन तुला."

मिळताच मोल रोकडे
चालली नाव पलिकडे
अंधारही म्हणू लागला
"चल, पल्याड घेउनी मला."

"Ferryman" - by Christina Rossetti

"Ferry me across the water
Do, boatman, do."

"If you've a penny in your purse
I'll ferry you."

"I have a penny in my purse,
And my eyes are blue;
So ferry me across the water,
Do, boatman, do."

"Step into my ferry-boat
Be they black or blue,
And for the penny in your purse
I'll ferry you."

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

शांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी "याला जीवन ऐसे नाव" ही व्ही सी डी पहा