१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

आवडता खाऊ

शाळेतल्या चिमण्यांना वाढदिवसाची भेट
कुणीतरी पाठवली मिठाईची लयलूट.
कुणा आवडले लाडू, कुणा श्रीखंड बासुंदी
कुणि घेतली जिलेबी, कुणि खाई पेढे कंदी.

दूर एका कोपऱ्यात एक होते गोड फूल
मुल नव्हे तत्वज्ञ तो विचारात होता चूर.
"सांग तुला काय देऊ, रसगुल्ले, बर्फी, पेढे?
म्हणे बाळ गंभीर ते, "मला नाही ते आवडे!"
"पाहिजे ते माग तुला, नको खिन्न असा राहू,
सांग बाळा, कोणता रे तुझा आवडता खाऊ."

उंच निळ्या आभाळात, टक लावुनी पहात
दिले उत्तर बाळाने, झाले गुरुजी स्तिमित.

"काळ्या पेटीत ढगांच्या, ठेविलेला साठवून
पावसाच्या संगे खाली, देव देतो पाठवून
गारा येती भुईवर, थडा थडा सडा सडा
अमृताचा एक एक जणु सांडतो तुकडा
आवडतो सदा मला खाऊ एकच तेवढा
देवाच्या त्या खाऊपुढे, फिका लाडू, फिका पेढा!!"

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

शांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी "याला जीवन ऐसे नाव" ही व्ही सी डी पहा