१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

अंगाई गीत

घरट्यात माउलीला म्हणे चिमणुल्याची स्वारी
"झुंजुमुंजु झाले आई, उंच घेऊ दे भरारी!"

"पंख अजुनी कोवळे, बाळा करू नको घाई
माझ्या मायेच्या उबेत शांत करी रे अंगाई!"

केली अंगाई बाळाने, नीट घेतला विसावा
मग जाग येता उंच, उडे गरुडाचा छावा.

जाग येता पाळण्यात, म्हणे माउलीला सोने
"बघ उधळीले कोणी आभाळात खूप सोने.

घालु नको पांघरूण, मला उठू दे लौकर
चिऊ काऊ बोलाविती खेळायास उंचावर."

"करू नको अशी घाई, कोवळी तु जाई जुई
गाणे म्हणते बाळाला, शांत करी रे अंगाई."

बाळ चांगुणे शहाणे, पाळण्यात झोपी गेले
राजहंसाचे लेकरू जाग येताच उडाले!

"Cradle Song" - by Lord Tennyson

What does little birdie say
In her nest at peep of day?
Let me fly, says little birdie
Mother, let me fly away.
Birdie, rest a little longer,
Till thy little wings are stronger.
So she rests a little longer
Then she flies away.

What does little baby say
In her bed at peep of day?
Baby says like little birdie,
Let me rise and fly away.
Baby sleep a little longer
Till thy little limbs are stronger
If she sleeps a little longer
Baby too shall fly away.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

शांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी "याला जीवन ऐसे नाव" ही व्ही सी डी पहा