१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

वारा वाहतो वाहतो

वारा वाहतो वाहतो, वारा दिसेना दिसेना
पुसा ओळख वाऱ्याची सळसळत्या पानांना.
गातो गोड गोड गाणी, गोष्टी सांगतो कानात
फुलांसंगे पानांसंगे वारा खिदळे रानात

कधी वाऱ्याची पालखी येते डुलत डुलत
कधी येतो धडाधडा रथ रागात वेगात
भूमीवर लोळणारी डेरेदार दाट दाट
आकाशाशी खेळणारी उंच उंच ताठ ताठ
झाडे झुकविती माथा वाऱ्यापुढे वाकतात.

वारा वाहतो वाहतो वारा दिसेना दिसेना
वारा वाहिल्यावाचून सृष्टी हलेना, हासेना!

"Who has seen the wind?" - by Christina Rossetti

Who has seen the wind
Neither you nor I

The wind is passing through
Who has seen the wind
Neither you nor I

But when the trees bow down their heads,
The wind is passing by.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

शांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी "याला जीवन ऐसे नाव" ही व्ही सी डी पहा