१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

शेवग्याच्या शेंगा

'वहिनींच्या बांगडया' या चित्राच्या उत्तुंग यशाने उत्साहित होऊन य.गो.जोशी यांच्या 'शेवग्याच्या शेंगा' या कथेवर एक अकृत्रिम कौटुंबिक चित्रपट तयार केला. या चित्राला फ्रान्समधील कॅन्स (Cannes Film Festival) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Critic Award) बक्षीस मिळाले. या चित्रपटाचा दिल्लीतील प्रीमियर भारताचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला होता.

वडिलांच्या मृत्युनंतर एकमेकांकडे पाठ फिरवलेल्या भावांना आपल्या प्रेमाने पुन्हा एकत्र आणून विस्कटलेले घर सावरणाऱ्या बहिणीची ही कथा. बेबी नंदा या हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा हा तिच्या या क्षेत्रातील पदार्पणातील पहिल्या काही चित्रांपैकी यशस्वी ठरलेला चित्रपट. तिच्याबरोबर मास्टर छोटू, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले हे पिता पुत्र, सुमती गुप्ते असे दर्जेदार कलावंत होते. वडिलांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीच्या समारंभात शास्त्रीय संगीताची मैफल दाखवली आहे, त्यासाठी सुप्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांना पाचारण केले होते आणि त्यांच्यावर त्यांनीच गायलेले गाणे चित्रित करण्यात आले होते.

आज प्रचलित असलेली 'स्टोरी बोर्ड' ही संकल्पना आठवले यांनी १९५४ साली या चित्रासाठी वापरली होती. 'वहिनींच्या बांगडया'चे वेळी ते चित्रीकरणाचा आराखडा करीतच होते. या वेळी त्यांनी दीक्षित नावाच्या एका चित्रकाराच्या मदतीने कॅमेऱ्यातून दिसणारा प्रत्येक शॉट चित्रबद्ध केला आणि त्या आराखड्यात अंतर्भूत केला. पुण्याच्या फिल्म अर्काइव्हजमध्ये याचे नमुने जतन केलेले आहेत.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

शांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी "याला जीवन ऐसे नाव" ही व्ही सी डी पहा