१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

वावटळ

निर्माते ना बा कामत यांनी त्यावेळचे प्रसिद्ध ग्रामिण कथालेखक शंकर पाटील यांच्या एका कथेवर तमाशा नसलेला ग्रामिण चित्रपट तयार करण्याची योजना आठवले यांच्यासमोर ठेवली. आठवले यांनी फिल्म्स डिव्हिजन सोडली आणि ती जबाबदारी स्वीकारली आणि ती अशी काही पार पाडली की त्यांनी त्या कथेवर तयार केलेल्या 'वावटळ' या चित्राला पु.ल.देशपांडे, गजानन जहागीरदार आणि विश्राम बेडेकर यांसारख्या दिग्गजांनी १९६५ - १९६६ सालच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान दिला. महाराष्ट्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पारितोषिकातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे पारितोषिक तर आठवले यांना मिळालेच पण सर्वोत्कृष्ट संकलन इत्यादी दहाहून अधिक तांत्रिक अंगांची पारितोषिकेही या चित्राने मिळवली.

यातील खास ग्रामिण बाजाच्या गाण्यांसाठी आठवले यांनी प्राध्यापक आनंद यादव यांना बोलावले. आठवले यांनी एकच गाणे लिहिले. 'श्रावणा बाळा पाणी आण' हे सुधीर फडके यांच्या आवाजातील गाणे राम कदम यांनी अतिशय परिणामकारक रीतीने स्वरबद्ध केले आहे. ते ऐकले आणि पहिले पाहिजे असेच आहे.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

शांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी "याला जीवन ऐसे नाव" ही व्ही सी डी पहा