१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव

दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव

जगताचे हे सुरेख अंगण, खेळ खेळूया सारे आपण
रंक आणखी राव, खेळू या रंक आणखी राव
याला जीवन ऐसे नाव.

माळ यशाची हासत घालू, हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव, झेलू या पराजयाचे घाव
याला जीवन ऐसे नाव.

मनासारखा मिळे सौंगडी, खेळाया मग अवीट गोडी
दु:खाला नच वाव, दु:खाला नच वाव
याला जीवन ऐसे नाव.

रामशास्त्री

'रामशास्त्री' या ऐतिहासिक चित्रपटात आधी एकच गीत घालायचे असे ठरले होते. तेही छोटा राम आणि त्याची सखी जानकी ही दोघे खेळत असताना. या प्रसंगासाठी आठवले यांनी मराठी चित्रपटगीतात मनाचे स्थान प्राप्त झालेले 'दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव' हे गीत लिहिले. जीवनाचे तत्वज्ञान इतक्या सोप्या शब्दात सांगितलेले इतरत्र कुठेही सापडणार नाही.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

शांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी "याला जीवन ऐसे नाव" ही व्ही सी डी पहा