तुझे माझे मन - जणु यमुनेचे तीर
तुझी माझी प्रीत - वेणू वाजे मनोहर.
तुझे माझे मन - सारवले वृंदावन
प्रीत आपुली साजिरी - तुळशीची गं मंजिरी.
तुझे माझे मन - उंच निर्मळ गगन
तुझी माझी प्रीत - सूरसरितेचा स्त्रोत.
तुझे माझे मन - उमलले पद्मदळ
तुझी माझी प्रीत - दरवळे परिमळ.
तुझे माझे मन - रानीवनीचे हरीण
प्रीत आपुल्या अंतरी - मृगापोटीची कस्तुरी.
तुझे माझे मन - प्रतिभेचा दिव्य क्षण
तुझी माझी प्रीत - अलौकिक भावगीत.
तुझे माझे मन - गगनीचा कृष्णघन
तुझी माझी प्रीत - झरे भूवरी अमृत.
तुझे माझे मन - मन – फुलला मोगरा
तुझी माझी प्रीत – प्रीत – गुंफिला गजरा.
तुझे माझे मन - पाणी भरलेली मोट
तुझी माझी प्रीत - झुळुझुळु वाहे पाट.
तुझे माझे मन - ब्रह्म अनंत निर्गुण
तुझी माझी प्रीत - मूर्त साकार सगुण !
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले