उषादेवी, संध्याराणी उघडा गं अंतरंग
घेईन मी साठवून उमलते रस रंग.
गीत तुमचे खगांनो, येते सहज आतून
थोडेतरी तयातून मज घेऊ द्या स्फुरण.
पसरून गीतगंध, सुखविशी सकलांना
तुझ्यापासून पवना, मला घेऊ दे प्रेरणा.
फुले – नव्हे विकसल्या जणु सृष्टीच्या भावना
कोमलांनो कानी सांगा, भाव सौंदर्याच्या खुणा.
उसळत्या लहरींनो, तुम्ही नाचा थयथय
मनी मुरवू द्या मला सम, ताल आणि लय.
मध्यरात्री एकांतात, अंतरीच्या गाभाऱ्यात
शब्दांविण आळवीन माझे गोड भावगीत !
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले