१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

भाऊ बहीण (ओव्या)

लाविता बाळ स्तनी अमृत पाझरते
बैसता जात्यावरी ओवी मंजुळ स्फुरते.

पावसावाचुन आखाड गेला सुना
कुठे माझा गं गुंतला, पाठचा भाऊराणा?

शेतात जोंधळ्याचे कणीस भरदार
तसे मानस उदार भाऊरायाचे !

धावते लगबगा, गंगा भेटाया सिंधुला
मनी मी गं उतावीळ, मिठी घालाया बंधूला !!

घेउनिया सुधाकुंभ गगनात चंद्र आला
अमृताची ओवाळणी धरणीला घालायाला.

बिलोरी आरशात बिंब उमटे गोमटे
भेटता भाऊराया प्रीती अंतरी दाटते.

दीपाची काजळी झडू झडू दूर झाली
पाहता भाऊराया, चिंता सारी ओसरली.

पतीच्या परीस भावाची माया मोठी
द्रौपदीला पाच पती, कृष्ण सोडवी संकटी !

दारी आला भाऊराया, अयोध्येचं रामराज्य
त्रिभुवना लाजवील, आज माझी भाऊबीज !!

target="_blank"

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले