नका बोलू असे दूर दूर बसून
माझ्यावर रुसून माझ्यावर रुसून
घ्या जवळ जवळ मला हसून
राया मनापासून हो मनापासून
नका बोलू असे दूर दूर बसून
माझ्यावर रुसून माझ्यावर रुसून.
तुमच्या डोळ्यातली मदिरा प्याले
गेले जिव्हारी आरपार भाले
हो मदनाचे भाले
गेले कुणीतरी उरी माझ्या डसून
अवचित घुसून
नका बोलू असे दूर दूर बसून
माझ्यावर रुसून माझ्यावर रुसून.
माझ्या जीवाची मंजुळ मैना
राया करू नका तिची अशी दैना
हो तिची अशी दैना
सोनं बावनकशी घ्या हो तुम्ही कसून
गहना घासून
नका बोलू असे दूर दूर बसून
माझ्यावर रुसून माझ्यावर रुसून.
घ्या हो तांबुल घालते मुखी
हो सांगा माझी चुकी
हो सांगा माझी चुकी
अहो रसिक रत्नपारखी, रत्नपारखी
शालू बुट्ट्याचा आज आले नेसून
टाका राग पुसून
नका बोलू असे दूर दूर बसून
माझ्यावर रुसून माझ्यावर रुसून.
मंत्रतंत्र, भोंदूगिरी करणाऱ्या दुष्टात्म्याच्या कारवायांना बळी पडलेल्या एका दुर्दैवी स्त्रीची ही कहाणी. फसवून लग्न करून दिला गेलेला नवरा बाहेरख्याली. विवाहापूर्वीचे नायिकेच्या स्वप्नदृश्यातले कृष्णभक्तिमय गीत 'नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली', पतीभक्त नायिकेचे 'मी नंदनवनी फिरते' हे गीत, चंगीभंगी नवरा क्लबमध्ये जातो तेथील 'वय माझं सोळा, जवानीचा मळा' हे उडतं पाश्चिमात्य नृत्यगीत आणि 'माडीवर' जातो तेथील 'नका बोलू असे दूर दूर बसून' ही मदमस्त लावणी आणि एक अंगाईगीत अशी विविध गीते आठवले यांनी या चित्रपटासाठी लिहिली आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांनी त्यांचं चीज केलं.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले