१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

झोप घे रे चिमण्या सरदारा

झोप घे रे चिमण्या सरदारा
अंगाईच्या पदराखाली लपल्या अमृतधारा
झोप घे रे चिमण्या सरदारा

पोलादाची ज्यांची छाती
शिवरायाचे शूर सोबती
रणमर्दांच्या पायकुळी तुज जन्म लाभला वीरा
झोप घे रे चिमण्या सरदारा

लखलखता तेजाचा पुतळा
तशी तिकडची स्वारी बाळा
त्या तेजाच्या तालावरती माझा डौल पिसारा
झोप घे रे चिमण्या सरदारा

झोप राजसा आज सुखाने
उठ सकाळी हसतमुखाने
तूच एक आधार जिवलगा भार तुझ्यावर सारा
झोप घे रे चिमण्या सरदारा

बेलभंडार

मंत्रतंत्र, भोंदूगिरी करणाऱ्या दुष्टात्म्याच्या कारवायांना बळी पडलेल्या एका दुर्दैवी स्त्रीची ही कहाणी. फसवून लग्न करून दिला गेलेला नवरा बाहेरख्याली. विवाहापूर्वीचे नायिकेच्या स्वप्नदृश्यातले कृष्णभक्तिमय गीत 'नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली', पतीभक्त नायिकेचे 'मी नंदनवनी फिरते' हे गीत, चंगीभंगी नवरा क्लबमध्ये जातो तेथील 'वय माझं सोळा, जवानीचा मळा' हे उडतं पाश्चिमात्य नृत्यगीत आणि 'माडीवर' जातो तेथील 'नका बोलू असे दूर दूर बसून' ही मदमस्त लावणी आणि एक अंगाईगीत अशी विविध गीते आठवले यांनी या चित्रपटासाठी लिहिली आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांनी त्यांचं चीज केलं.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

शांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी "याला जीवन ऐसे नाव" ही व्ही सी डी पहा