१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

जीवा, तुझ्या मोहिनीने भारले

जीवा, तुझ्या मोहिनीने भारले

उफाळूनी येती भाव चित्ती दाटले
जीवा, तुझ्या मोहिनीने भारले.

गूज मन्मनीचे केले खुले तुझ्यापाशी
तुझ्या अंतरीचे गूढ चित्ता नाकळे.

करी पुरी आशा, पदरी टाक वा निराशा
फिरायची मागे ही न आता पाऊले.

धरी शिरी अनुरागे, वा दुरी फेक रागे
सुको मुको प्राणा, पुष्प पायी वाहिले.

लपंडाव हा जिवाला गमे पापदायी
कधी व्हायचे हे उमाळे मोकळे?

माझा मुलगा

'माझा मुलगा' हा प्रभातचा सर्वस्वी सामाजिक, मध्यमवर्गीयांच्या नातेसंबंधांवरील कथा असलेले चित्र. या चित्रातील 'पाहू रे किती वाट' आणि 'उसळत तेज भरे गगनात' ही दोन गाणी शांता हुबळीकर यांच्या आवाजात लोकांच्या पसंतीस उतरली. 'उसळत तेज भरे गगनात' या गाण्याच्या वेळी त्या गाण्यात काय आशय हवा आहे हे आठवल्यांना सांगताना व्ही शांताराम म्हणाले होते की, "मला या गाण्यात एखादा बैरागी गातो तसं वर वर जाणारं, आभाळाला भिडणारं काही तरी हवं आहे!" 'पाहू रे किती वाट' यातील समुद्राच्या लाटा वर उसळल्याचा आभास उत्पन्न करणारे विलक्षण ताकदीचे संगीत लक्षणीय आहे.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले