१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

पाहू रे किती वाट?

पाहू रे किती वाट? जिवलगा
पाहू रे किती वाट?

हिंडते धुंडिते होई न भेटी
प्रीतीचे निधान येई न हाती
झाली बाला श्रांत, जिवलगा, पाहू रे किती वाट?

वन सळसळते, मन तळमळते
प्राणसख्या तव चाहूल येते
भेसूर घन तिमिरात, जिवलगा, पाहू रे किती वाट?

सागर खवळे, उसळती लाटा
झुंजत तयांशी हासशी नाथा
काहूर मम हृदयात, जिवलगा, पाहू रे किती वाट?

होईल केंव्हा मीलन अंती?
अवचित जुळतील प्रीति ज्योती
विश्वाच्या प्रलयात, जिवलगा, पाहू रे किती वाट?

पाहीन तोवरी वाट, पाहीन तोवरी वाट,
जिवलगा, पाहीन तोवरी वाट!

माझा मुलगा

'माझा मुलगा' हा प्रभातचा सर्वस्वी सामाजिक, मध्यमवर्गीयांच्या नातेसंबंधांवरील कथा असलेले चित्र. या चित्रातील 'पाहू रे किती वाट' आणि 'उसळत तेज भरे गगनात' ही दोन गाणी शांता हुबळीकर यांच्या आवाजात लोकांच्या पसंतीस उतरली. 'उसळत तेज भरे गगनात' या गाण्याच्या वेळी त्या गाण्यात काय आशय हवा आहे हे आठवल्यांना सांगताना व्ही शांताराम म्हणाले होते की, "मला या गाण्यात एखादा बैरागी गातो तसं वर वर जाणारं, आभाळाला भिडणारं काही तरी हवं आहे!" 'पाहू रे किती वाट' यातील समुद्राच्या लाटा वर उसळल्याचा आभास उत्पन्न करणारे विलक्षण ताकदीचे संगीत लक्षणीय आहे.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

शांताराम आठवले यांचे जीवन साहित्य आणि काव्य यांची ओळख करून घेण्यासाठी "याला जीवन ऐसे नाव" ही व्ही सी डी पहा