ही आमुची शाळा
जननीपेक्षा या आईचा अधिक लागला लळा
ही आमुची शाळा.
त्या आईने अन्न भरविले, या आईने ज्ञान पुरविले
तिने कळीला रूप दिले, मधुगंध हिने अर्पिला,
ही आमुची शाळा.
ऊब तिच्या घरट्यातील प्रेमळ, हिने पाजिले पंखांना बळ
गीत तिने, तर हिने शिकविली उड्डाणाची कला,
ही आमुची शाळा.
ती आई दे भाऊ बहिणी, ही दे जिवलग मित्र मैत्रिणी
अंगण इवले तिचे, इथे तर बाग नभाचा निळा,
ही आमुची शाळा.
शाळेमधल्या बालबालिका, निळ्या नभातील उजळ तारका
सप्तर्षी सद्गुरू शिकविती, मुक्तिमार्ग आगळा
ही आमुची शाळा.
सुखद येथले सरता जीवन, दिशादिशांना जाऊ पांगुन
परंतु राहिल आठवणींचा, कोंभ सदा कोवळा,
ही आमुची शाळा.
बाळे आमुची पुढे कदाचित, इथेच शिकतिल हासत नाचत
अपुऱ्या अमुच्या आकांक्षांचा अवतारच सानुला,
ही आमुची शाळा.
देश धर्म कुळ या सर्वांहुन, प्रिय आम्हाला ही स्वर्गाहुन
हिची थोरवी कवनी गाता, शब्दच हो पांगळा,
ही आमुची शाळा.
शाळा नच ही पुण्यपंढरी, पिढ्यापिढ्यांनी करणे वारी
शिळेशिळेतुन भरला 'विट्ठल', 'ज्ञानदेव' सावळा,
ही आमुची शाळा.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले