१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

चित्रकाराचा फलक आणि कोराच राहिला

  • एक होते झाड मोठे
    तिथे होती वसतीला
    खेळण्यात नाचण्यात
    अंग कोवळे कोवळे
    एक होता चित्रकार
    लेकरांची पाखरांची
    होती पशूंची पक्ष्यांची
    कुणीतरी साधूने ही
    डेरेदार झाडापाशी
    होता फलक काखेत
    बगलेत होती त्याच्या
    होती 'जम्मत गम्मत'
    कोण कुठला हा आला
    खारुबाईंना वाटली
    मागे पुढे, खाली वर,
    खारुबाईंच्या सारख्या
    तालामध्ये हाले डोले
    खारुबाईंची धावरी
    चिमुकले दोन हिरे
    धगधगते निखारे
    खारुबाईंना पाहून
    आणि घेतला तयाने
    तेवढ्यात खारुबाई
    चित्रकाराच्या कौतुके
    'नाही धोका नाही घात
    चिमुकल्या खारीच्या त्या
    पुन्हा पातली नाचत
    दोन इंगळ डोळ्यांचे
    केला चीत्कार आनंदे
    चित्रकाराच्या हर्षाला
    खार होती ती म्हणत
    बगलेच्या पिशवीत
    चारा चुरा मुठभर
    येऊ द्या की थोडा तरी
    असे म्हणून घेतली
    चित्रकाराने घेतली
    मुठीतला 'चिऊचारा'
    खाऊ घेऊन क्षणात
    आणि पातली ती पुन्हा
    हेतू जाहला सफल
    "खारीबाई खारीबाई
    भिऊ नको भरवसा
    चित्रकार म्हणे तिला
    "पाखरांचा लेकरांचा
    पुन्हा करीत चीत्कार
    इजा बिजा आणि तिजा
    क्षणभर राही स्थिर
    झळाळते दोन हिरे
    एकसारखा जाहला
    चित्रकाराला कळला
    'दिला खावयास खाऊ
    तरी माणूस प्राण्याच्या
    कधी करेल शिकार
    नेम नाही माणसाचा
    माणसाशी करा मैत्री
    रानातल्या पशु पक्ष्या
    मुक्या जीवाचे ते बोल
    आणि नकळत त्याच्या
    आणि करीत चीत्कार
    पुन्हा पळाली नाचरी
    होता कधीच गळाला
    चित्रकाराचा फलक

  • डेरेदार घेरेदार
    चिमुकली एक खार.
    असायची सदा दंग
    गर्द भुरा भुरा रंग.
    चित्रे काढी मनोहर
    माया त्याला अनिवार.
    समजत त्याला बोली
    विद्या होती त्याला दिली.
    आला फिरत फिरत
    आणि कुंचला हातात.
    चिमुकली एक झोळी
    तिच्यामध्ये भरलेली.
    आहे पारधी शिकारी?
    जगावेगळी ही स्वारी.
    भराभरा, तरातरा
    सुरु झाल्या येरझारा.
    उभी साजिरी शेपटी
    मूर्ती सुबक गोमटी.
    तसे लाल लाल डोळे
    उजळले इवलाले.
    चित्रकार आनंदला
    हाती सुबक कुंचला.
    पळाल्या की शेंड्यावर
    हासू आले ओठावर.
    प्राणी दिसतो हा भला'
    विचार हा मनी आला.
    ठुमकत मुरडत
    होते पहात बोलत.
    चिर चिर चिर चिर
    उरला न पारावर.
    "अहो थोर महाशय
    भरलेले आहे काय?
    तुमच्या त्या थैलीतला
    गरीबाच्या वाटणीला."
    तिने गिरकी फिरून
    मूठ हळूच भरून.
    त्याने फेकिला समोर
    झाली चंचला पसार.
    नाचवीत शेपटीला
    घास आणखी मिळाला.
    का गं पळतेस दूर?
    ठेव गडे माझ्यावर."
    आर्जवाने आळवीत
    मायाळू मी खरा मित्र."
    मागे गेली पुढे आली
    भेट खाऊची मिळाली.
    रोखुनिया लाल डोळे
    अग्निकण इवलाले.
    सुरु खारीचा चीत्कार
    तिच्या मनीचा विचार :
    आणि वाटला प्रेमळ
    जाऊ नयेच जवळ,
    कधी घेईल तो प्राण
    कारण तो 'बुद्धिमान'
    चार पाऊले दुरून
    'स्वतंत्रता' जीवप्राण!'
    चित्रकाराने ऐकले
    डोळ्यांमध्ये अश्रू आले.
    चिर चिर चिर चिर
    उंच झाडावर खार.
    हातामधला कुंचला
    आणि कोराच राहिला!!

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले