१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

नवरत्न दरबार

'अकबर' राजा थोर त्याचा नवरत्नांचा दरबार.

'बिरबल' त्याचा हुशार मंत्री, लढवी युक्ती सांगे गोष्टी,
कविता सुंदर लिही, बुद्धीला ठाऊक नव्हती हार!

'तानसेन' करी मंजुळ गायन, बादशहाचे करी मनरंजन
गायन नोहे, वाहे जणु की स्वर्गसुखाची धार.

'मानसिंह' तो सिंहच दुसरा, गाजे त्याचा धाक दरारा
हत्ती, घोडे, नरवीरांचा प्रचंड तो दळभार.

'बदाउनी' तो सुप्रसिद्ध लेखक अनुवादी तो ग्रंथ अमोलिक
'भारत', 'श्री रामायण' ज्यांच्या माधुरीस नच पार.

'अकबरनामा', 'ऐनेअकबरी' रचना यांची 'अबुल फझल' करी
बादशाहाच्या थोरपणाचा करितो जयजयकार.

'फैजी' होता नामी शाहीर, 'हमाम मुल्ला' तसाच 'तोडर'
अनेक ऐसे हिरे तळपती तेजस्वी सरदार.

श्रीरामाची मंगल महती, 'सूरदास' अन् 'तुलसी' गाती
इतिहासामध्ये अकबर राजा कायमचा उरणार.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले