पायाखाली म्हणे भूमी "जगा नाही काही कमी"
निळे निर्मळ आकाश, आम्हा शिकवी विकास.
आरवते ही पहाट, "पुढे बघा , जगा नीट"
म्हणे सूर्यनारायण, "तुम्ही माझेच किरण!"
हेच खगांचे सांगणे, "गाणे म्हणजे जगणे."
वदे वाहणारा वारा, "फिरा, उपकार करा."
देती सुमने संदेशा, "आनंदाने हसा हसा."
गवताची लव लव मनी ठसवी मार्दव.
नदी निर्झर प्रार्थिती, "वहा, रहा शुद्धमती."
वृक्ष साक्ष हीच देती, "फळे असावी गोमटी."
उसासते ही दुपार, "सुख कष्टात अपार."
कुजबुजे सायंकाळ, "उगा नको धावपळ."
खुणाविती ग्रहतारे, "फेर धरा, नाचा सारे."
मंत्र सांगे निशानाथ, "प्रेम अमृत अमृत."
देतो इशारा अंधार, "गर्वा, घर खाली कर."
गर्जतात मेघपंक्ती, "दया माया ठेवा पोटी."
बोले इंद्राचे धनुष्य, "असे रंगवा आयुष्य!"
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले