झर झर झर झर धार झरे
धार सुधेची कामधेनूची
भर भर भर भर कलश भरे.
नंदनवन सम गमते गोकुळ
शान्तिसौख्यमय जीवन मंगल
वैभव धन हे अमोल येथिल
धेनु, गोजिरी वासरे.
हरीची मुरली वाजे मंजुळ
प्रमुदित करिते गोकुळ सारे.
राधा कृष्ण यांची प्रीती, कृष्णाचे बालपण, गाई आणि गोपाल यांच्याबरोबरचे गोकुळातील दिवस, कृष्णाच्या चमत्कारकथा, कंसाचा नि:पात आणि राधा, गोकुळजन आणि संपूर्ण विश्वाला वेड लावणारी कृष्णाची मधुर मुरली यांनी नटलेले 'गोपालकृष्ण' हे चित्र विशेषत: त्यातील सुमधुर गाण्यांमुळेच लोकप्रिय झाले. प्रशंसा पत्रांचा पाऊस पडला.
गोव्याचे दिगंबरदास कामत नावाचे तत्वज्ञानाचे अभ्यासू यांना 'वंदित राधाबाला' या गाण्यातील "ब्रह्म सानुले हे साकार" हा चरण इतका आवडला की "कवीला कडकडून भेटावे" म्हणून ते गृहस्थ प्रभात मध्ये आले. त्यांनी "राधामातेच्या चरणाची धूळ" म्हणून जेथे चित्रीकरण झाले होते तिथली धूळ कपाळावर लावून घेतली.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले