वानु किती रे सदया विठुराया दीनवत्सला
दीनवत्सला धावुनि ब्रीदासी राखिले
अमृतचि हे वोळले, कृष्ण रुपडे देखियले
विश्व अवघेचि त्यात विरले, हे ध्यान सावळे
या चित्रपटातील गीतांचा गौरव लोकमान्य टिळकांच्या केसरी या वर्तमानपत्राने २६ मार्च १९३० च्या अंकात, आपली शिस्त मोडून, मुद्दाम केला. "पांडुरंगाच्या कृपेने शिवाजीमहाराज सुखरूप असल्याचे पाहून पागनीसांनी 'वानु किती रे सदया विठुराया, दीनवत्सला' या पदाच्या द्वारे झालेला आनंद इतक्या बहारीने व्यक्त केला आहे की त्याबद्दल पागनीसांचे अधिक अभिनंदन करावे की इतके नादमधुर व रसप्रचुर पद रचणारे श्री शांताराम आठवले यांचे करावे हेच कळेनासे होते --- श्री शांताराम आठवले यांनी केलेली पदेही रसपरीपोषक व नादमधुर अशीच आहेत. 'आधी बीज एकले' हे त्यांचे पद्य पोरासोरांच्याही तोंडी झाले आहे. या वरून त्या पदाची योग्यता कळून येईल. असे उदात्त, उपदेशपर बोलपट वारंवार पहावयास मिळतील तर बोलपटसृष्टीवरील आक्षेप आपोआपच गळून पडतील."
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले