तू नसतीस तर रोप चिमुकले
गेले असते सुकून वाकुन
तू नसतीस तर केले असते
कुणी तयावर अमृत सिंचन?
तू नसतीस तर.
तू नसतीस तर मिळता कोठून
घरट्याचा हा रम्य निवारा
तू नसतीस तर मिळता कोठून
पंखाखाली गोड उबारा?
तू नसतीस तर.
तू नसतीस तर कळली नसती
कळ्या फुलांची कोमल बोली
तू नसतीस तर मिळली नसती
मृदु शीतलता चांदण्यातली
तू नसतीस तर.
तू नसतीस तर कळले नसते
जीवन म्हणजे अथांग प्रीती
तू नसतीस तर जुळल्या नसत्या
गीताच्या या मंजुळ पंक्ती
तू नसतीस तर.
सदाशिव जे रावकवी यांच्या 'चित्रसहकार' या निर्मिती संस्थेसाठी य.गो.जोशी यांच्या कथेवरील या चित्राने पंचवीस चित्रपटगृहात प्रत्येकी पंचवीस आठवडे चालण्याचा विक्रम केला. त्याच बरोबर संपूर्ण चित्र फक्त पस्तीस दिवसात मुहूर्तापासून सेन्सॉरपर्यंत पूर्ण करण्याचाही विक्रम आठवले यांनी केला. चित्रीकरणाचे अभ्यासपूर्ण संयोजन आणि तंत्रावरील प्रभुत्व या आठवले यांच्या गुणांमुळेच ते शक्य झाले.
मातृसुखाला पारखा झालेला दीर आणि पुत्रखापासून वंचित राहिलेली वहिनी यांच्या निर्मळ प्रेमाची अत्यंत जिव्हाळ्याने चित्रित केलेली कौटुंबिक कलाकृती. या चित्रपटाने सुलोचना या अभिनेत्रीला ग्रामीण चित्रपटातून घरात, माजघरात, अगदी स्वयंपाकघरात आणले. सोज्वळता म्हणजे सुलोचना या समीकरणाची सुरवात या चित्राने झाली. दिग्दर्शन आणि गीतलेखन याखेरीज आठवल्यांनी या चित्रात एक सुलोचना यांच्या पतीची भूमिकाही केली होती. हे चित्र एका वेगळ्या अर्थानेही कौटुंबिक होते – यात आठवले यांचे संपूर्ण कुटुंब पडद्यावर दिसले होते. मुलगा सुदर्शन छोट्या भावाचा शाळेतील मित्र झाला होता. सुमतीबाई, मुली आणि एक मेव्हणी यांनी हळदीकुंकवाच्या प्रसंगात भाग घेतला होता. दादा म्हणजे आठवले आणि वहिनी म्हणजे सुलोचना यांच्या पडद्यावरील लग्नप्रसंगी सुमतीबाई नवऱ्याच्या लग्नाला नवऱ्यामुलीच्या मागे करवली म्हणून हजर राहिल्या आहेत.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले