१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

माझ्या माहेरी सुखाची सावली गं

माझ्या माहेरी सुखाची सावली गं
माझ्या माहेरी सुखाची सावली.

कृष्णाबाईचं निर्मळ पाणी
पिके जोंधळा मोत्यावाणी
ओढ्याकाठी आंबराई लवली गं
माझ्या माहेरी सुखाची सावली.

माझ्या आईची माझ्यावर माया
जशी आभाळाची जगावर छाया
प्रेमा पाजिते पावलो पावली गं
माझ्या माहेरी सुखाची सावली.

जसा सूर्याचा पहारा नभी
तशी शेताच्या बांध्यावर उभी
माझ्या बाबांची मूर्ती सावळी गं
माझ्या माहेरी सुखाची सावळी.

माझ्या अंगणी गोठाभर गाई
गोऱ्हे बैलांची गणतीच नाही
ही दौलत सोन्याहून पिवळी गं
माझ्या माहेरी सुखाची सावळी.

पूर्वजन्मात सुकृत केलं
सुख ललाटी आता आलं
माझ्या भक्तीला अंबाबाई पावली गं
माझ्या माहेरी सुखाची सावली.

भाग्यरेखा

१९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन, सामान्यांचा त्यांना मिळालेला सक्रीय, धाडसी पाठिंबा अशी राजकीय पार्श्वभूमी, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग आणि "निर्भयतेने जीवन जग" असा संदेश देणारे हे चित्र होते. पटकथा, गीते आणि दिग्दर्शन या जबाबदाऱ्या आठवले यांनी उचलल्या. केशवराव भोळे यांनी श्रीधर पार्सेकर या तरुण संगीतकाराबरोबर आठवल्यांच्या गीतांना संगीताने नटवले. शांता आपटे, बाबुराव पेंढारकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबत पु.ल.देशपांडे यांनीही या चित्रपटात भूमिका केली होती. तो त्यांचा दुसराच चित्रपट होता.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले