हासत वसंत ये वनी, अलबेला, हां
प्रियकर पसंत हा मनी धरणीला.
घनवन राई, बहरूनी येई
कोमल मंजुळ कोयल गाई
आंबा पाही फुलला, चाफा झाला पिवळा
जाई जुई चामेलीला भर आला शेवंतीला
घमघमला ! हासत वसंत ये वनी, अलबेला
सतेज टवटवली, कळी जशी कवळी
नभात लुकलुकली चंद्रकोर इवली
आला शीतळ वारा, बरसत अमृतधारा
मृदुल फुलांचा करी झुला, अलबेला
हासत वसंत ये वनी, अलबेला
हिंदु मुसलमान ऐक्य या संवेदनशील विषयावरील 'शेजारी' या चित्रपटाच्या प्रत्येक गीतासाठी व्ही शांताराम यांनी अतिशय परिणामकारक प्रसंगांची निवड केली होती. "शब्दात जेवढे लालित्य, चित्रमयता आणि वैविध्य आणता येईल तेवढे आणा" अशी सूचना त्यांनी आठवल्यांना केली होती. मास्टर कृष्णराव यांच्याकडून आगळ्या वेगळ्या चाली काढून घेतल्या होत्या आणि बहारदार पार्श्वसंगीताची योजना केली होती. नायक नायिकांचे प्रेमप्रसंग खुलवणारी 'हासत वसंत ये वनी', राधिका चतुर बोले', अशी गोड प्रेमगीते आठवल्यांनी लिहिली. त्यात 'अलबेला; यासारखे अनवट शब्द वापरून ती खुलवली. 'लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' हे मशालींचे नृत्यगीत तर अजरामर आहे. आजही, सत्तर वर्षांनंतर ते अनेक कार्यक्रमात सादर होते आणि नव्या गाण्यांहून जास्त गाजते. धरण फुटून प्रलय होतो. गाव वाहून जाते असे दृश्य खरे वाटावे म्हणून ही शांताराम यांनी खास प्रल्हाददत्त नावाचा स्पेशल इफेक्ट्सचा तज्ञ आणला होता. त्या प्रसंगानंतरचे 'सारे प्रवासी घडीचे' हे समूहगीत त्यातल्या अर्थपूर्ण शब्दांनी चित्रपटाचा शेवट वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले