दैवा तुला जोडीले हात
या जगतावर तुझीच सत्ता देव तुझ्या धाकात
दैवा तुला जोडीले हात.
सुमने सुंदर तूच फुलाविशी
मने मनाला तूच मिळवीशी
तूच कठोरा करिसी त्यावर अग्नीची बरसात
दैवा तुला जोडीले हात.
संसाराची मोहक माया
धावे मानव मृगजळ प्याया
तुझा निर्दया तोच अचानक घुसतो तीर उरात
दैवा तुला जोडीले हात.
जगात माणुस लुळा पांगळा
डोळे असुनी खुळा आंधळा
अज्ञानाची अखंड यात्रा चाले अंधारात
दैवा तुला जोडीले हात.
चिकणमातीच्या अप्रतीम कलाकृती निर्माण करणाऱ्या एका कलावंताची ही कथा. त्याला व्यवहार जमत नाही. कुटुंब हलाखीत दिवस काढीत असतानाच मुलगा मरण पावतो. सुनेला सांभाळतो, नातीला शिकवतो पण दैवाच्या झंझावातापुढे 'दैवा तुला जोडीले हात' या आठवले यांच्या शब्दात हात जोडून हार मानतो. आठवले यांनी मातीची महती सांगणारी एक उत्तम कविता या चित्रपटासाठी लिहिली. त्याची ध्वनीमुद्रिका उपलब्ध नाही पण ती वाचण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल :
ही माती !
मातीतुनी जन्म घेती जगताच्या रम्यकृती
ही माती !
मातीतुनी अवतरती सुंदर सुकुमार फुले
मातीतुन मानवास खावयास अन्न मिळे !
नटलेली ही नगरे ही तिचीच श्रीमंती
ही माती !
मातीच्या मंदिरात मातीचा देव उभा
मातीच्या पणतीतून फाकतसे दिव्यप्रभा
माती ही मानवास शिकवितसे प्रभूभक्ती
ही माती !
जन्म ज्यास मृत्यू त्यास - नियतीचा नियम अटळ
न कळे हा कोणाचा - का - कशास - दिव्य खेळ ?
मातीतुन जन्म आणि शेवटही माती !
ही माती !
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले