१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

धरणी मुकली मृगाच्या पावसाला (ओव्या)

धरणी मुकली मृगाच्या पावसाला
सुख माझे हरपले, कुठे शोधू गं भावाला?
अनंत गगनी तारका अगणित
तसे आठवू भावांचे गुण किती असंख्यात.

चंद्राचे प्रतिबिंब, गंगेच्या प्रवाहात, गंगेच्या प्रवाहात
भावाची रम्य मूर्ती उभी माझ्या मानसात.

देवाच्या देवळात गोड सनई वाजते, गोड सनई वाजते
भाऊरायाची प्रेमळ हाक अंगणात येते.

वार्याची झुळूक आणी सुगंध फुलांचा आणी सुगंध फुलांचा
सांग जिवाच्या मैत्रिणी, गोड निरोप भावाचा,
गोड निरोप भावाचा.

शेवग्याच्या शेंगा

वडिलांच्या मृत्युनंतर एकमेकांकडे पाठ फिरवलेल्या भावांना आपल्या प्रेमाने पुन्हा एकत्र आणून विस्कटलेले घर सावरणाऱ्या बहिणीची ही कथा. बेबी नंदा या हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा हा तिच्या या क्षेत्रातील पदार्पणातील पहिल्या काही चित्रांपैकी यशस्वी ठरलेला चित्रपट. तिच्याबरोबर मास्टर छोटू, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले हे पिता पुत्र, सुमती गुप्ते असे दर्जेदार कलावंत होते. वडिलांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीच्या समारंभात शास्त्रीय संगीताची मैफल दाखवली आहे, त्यासाठी सुप्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांना पाचारण केले होते आणि त्यांच्यावर त्यांनीच गायलेले गाणे चित्रित करण्यात आले होते.

आज प्रचलित असलेली 'स्टोरी बोर्ड' ही संकल्पना आठवले यांनी १९५४ साली या चित्रासाठी वापरली होती. 'वहिनींच्या बांगडया'चे वेळी ते चित्रीकरणाचा आराखडा करीतच होते. या वेळी त्यांनी दीक्षित नावाच्या एका चित्रकाराच्या मदतीने कॅमेऱ्यातून दिसणारा प्रत्येक शॉट चित्रबद्ध केला आणि त्या आराखड्यात अंतर्भूत केला. पुण्याच्या फिल्म अर्काइव्हजमध्ये याचे नमुने जतन केलेले आहेत.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले