१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

आला वसंत ऋतु आला

आला वसंत ऋतु आला
वसुंधरेला हसवायाला
सजवित नटवित लावण्याला
आला, आला वसंत ऋतु आला

रसरंगाची करीत पखरण
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला
वसंत ऋतु आला.

वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलातून अमृत भरले
वनावनातून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा
वसंत ऋतु आला.

व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममिलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला
वसंत ऋतु आला.

सुभद्राहरण

आठवले यांनी होमी वाडिया यांनी निर्मिलेल्या 'सुभद्राहरण' या चित्रासाठी लिहिलेली आणि वसंत पवार आणि प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेली गीते आजही अत्यंत लोकप्रिय आहेत.'आला वसंत ऋतु आला, 'उमलली एक नवी भावना' 'कुणाला सांगू माझी व्यथा', एकटी मी एकटी', 'बघत राहू दे तुझ्याकडे' ही सर्वच्या सर्व गाणी श्रवणीय आहेत.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले