१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

गुदगुल्या - नर्म विनोदी कविता

  1. फलक "नाही धोका – - वेगे हाका"
  2.  
  3. लग्नदिवस मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा
    चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा?
  4.  
  5. मंगळावरची मुलगी मुलगी आमुची?
    आहे ना लग्नाची!
    'मंगळा'ची?
    छे छे –
    मंगळवारची!!
  6.  
  7. २११० साली " – शतकही नाही झाले अजुनी
    भारतातल्या अपुल्या रमणी
    गळ्यात काळी पोत बांधुनी –
    दास्याची जी उघड निशाणी !
    तिलाच 'मंगलसूत्र' म्हणोनी –
    मिरवीत होत्या खुळ्या अडाणी!!"
  8.  
  9. नाटिका प्रेमभराने सांगत होती
    आईला बालिका
    "काल रेडिओवरती होती
    छान किती नाटिका!
    भांडत होती तुझ्यासारखी
    हुबेहूब नायिका
    शांत बिचारा नवरा होता
    बाबांच्यासारखा!!"
  10.  
  11. उशिरा येणारे मास्तर विशाल विद्यालय विश्वाचे
    तिथे मुरब्बी 'अनुभव' मास्तर
    अवलक्षण पण एकच त्यांचे
    सदा उशिरा ये कामावर !!
  12.  
  13. नवे घर खाणावळ भोजनाला
    आश्रयाला ऑफिसात
    एकांताला सिनेमात
    खोलीवर झोपायाला
    असे आहे सोयीस्कर
    विभागले नवे घर!!
  14.  
  15. आणा शपथा ज्या चंद्राला साक्षी ठेवुन
    झाल्या आपुल्या आणा शपथा
    समजून आले मज मागाहून
    चंद्र सखे तो कृत्रिम होता!!
  16.  
  17. कुंकू आणि लिपस्टिक लावीत होतो पूर्वी आम्ही
    'कुंकू' अमुच्या भाळी
    काळ बदलला तशा बदलल्या
    रुढी आणिक चाली!
    सौभाग्याचे चिन्ह हळूहळू
    घसरून आले खाली
    त्या तिलकाचे रूप बदलते
    ही ओठांची लाली!!
  18.  
  19. भूपाळी गोड गुलाबी झोपेमधुनी
    जागे करिते मला पहाटे
    विहंगमाचे गायन मंगल?
    नव्हे – मुलांची माझ्या दंगल!!
  20.  
  21. नवा आरसा पहिला वाहिला केस पांढरा
    प्रतिबिंबामधि ठेविल लपवुन
    असा कुणीतरी शोधुनि काढा
    शास्त्रज्ञांनो नवीन दर्पण!!
  22.  
  23. सिद्धांत जितकी ज्याची ठाम मते
    तितके त्याचे मन कोते!!
  24.  
  25. धोका लाल रंग ही धोक्याची अन् अपघाताची खूण
    शाळेमध्ये झाले होते बाळाला हे ज्ञान
    विद्यार्थी तो सहज विचारी पित्यास अपुली शंका
    आईच्या ओठाची लाली सुचवी कसला धोका?
  26.  
  27. बदल होतात बदल जे लग्नाने पुरुषात
    बहुमोल वाटतो मजला हा सर्वात
    कधिकधी वाटते योग्यांनाही कठिण
    ते आपोआपच साधे त्याला – 'मौन'!!
  28.  
  29. सुख जगात मिळते सुख पैशाने
    द्रव्य न लाभे हाय! सुखाने!!
  30.  
  31. नवे 'बायबल' (Love thy neighbor!) स्तुतिपाठकाचे घर असावे शेजारी
    सोपे होईल करणे मग प्रेम तयावरी!
  32.  
  33. रहस्य वयोवृद्ध तो हासत गाली,
    नवयुवकांना म्हणे –
    जगावेगळे गमेल माझे एकांतिक सांगणे
    संसारातील सुखशांतीचे रहस्य घ्या समजुन –
    'खरे नेहमी लपवित जावे अर्धांगीपासुन'!
  34.  
  35. नीती प्याल्यावाचुनी मदिरा उंची,
    नकाच चर्चा करू नीतिची!!
  36.  
  37. रजा आणि पगार पगार आणि रजा यामधे
    असे रजेचे महत्व मोठे
    पगार पुरतो आणि वाढतो,
    रजा न वाढे, कधी न पुरते!!
  1. नवे नाव विवाहाचे नवे नाव – 'घटस्फोटास पात्रता!'
  2.  
  3. विष्णूची ललना शर्यतीतल्या घोडयांना असेल का ही कल्पना?
    'जॉकी' –नव्हे – पाठीवरी धावे 'विष्णूची ललना'!
  4.  
  5. खूण "कुठे राहता आपण? सांगा ठळकशी खूण"
    "अंत्यविधी सामानाचे आहे खालती दुकान
    आणि वरती प्रसिद्ध आहे 'प्रसूती सदन' !!
  6.  
  7. नवलकथा 'तो' आणि 'ती ' यांची होती प्रीती
    विवाहात ती करुनी परिणत
    झाले दोघे जन्मसोबती!
    आणिक ऐका पुढती – अद्भुत
    अजुनि सुखाने नीट नांदती!!
  8.  
  9. जग धरणी आणिक आभाळाचे
    भांडण झाले पती-पत्नीचे
    रुसली, बसली 'आई' खाली
    'बाप' भडकला चढे महाली
    रडे तडफडे केविलवाणे
    मध्ये जगाचे बालक तान्हे!!
  10.  
  11. उद्याचा संसार जन्म जाहला पृथ्वीवरती
    चंद्रावरती शिक्षण झाले
    प्रेम मंगळावरती जमले
    मुले खेळती शुक्रावरती!!
  12.  
  13. नकली हास्य मी हसतो – पण माझे हसणे
    जगास भासे – उदास उसने
    दोष न माझा नसे जगाचा
    कसे फुटावे हास्य गोमटे
    दातच असता नकली खोटे!!
  14.  
  15. झाकली मूठ 'पुरुषांचे आहे जग हे' सगळे म्हणती
    का वाटुनी घेता तुम्ही स्त्रियांनो खंती?
    तुमचेच शेवटी विश्वावर स्वामित्व
    उघडून पहा की घट्ट आपुली मूठ!!
  16.  
  17. कानगोष्ट टिकावयाचे असेल जर का
    सतत आपुले सांसारिक सुख
    नका कधीही बघू सकाळी
    अंथरुणातिल पत्नीचे मुख!!
  18.  
  19. समस्या रसायनाच्या किमयेपोटी
    बाळे येतिल जी जन्माला
    प्रेमभराने 'बाबा' म्हणुनी
    हाक मारतील ती कोणाला?
  20.  
  21. अभिन्नता लग्नानंतर दोन जिवांची
    होते म्हणती 'अभिन्नता'
    कोठे पतीची, कुठे पत्निची
    एकाची उरते सत्ता!!
  22.  
  23. स्फूर्ती जेव्हां जेव्हां पत्नीसंगे
    घरात माझे होते भांडण
    तेव्हां तेव्हां फुलते स्फूर्ती
    प्रेमकाव्य मी लिहितो नूतन!!
  24.  
  25. टेकडी उजाड काळी, कोमलतेशी सदा जिचे भांडण
    गावाबाहेर उभी टेकडी फुगून रागावून!
    तिथेच येती परी विहारा रसिक विलासी जन
    कुरुपतेतही कुणाकुणाच्या असते आकर्षण!!
  26.  
  27. पैसा बोलतो पैसा बोलतो हे मजला पटले
    'जातो मी' त्याने कालच म्हटले!
  28.  
  29. लाटा वाऱ्याला नवकविता स्फुरली
    पंक्तींमागुनी लिहितो पंक्ती
    संथ नदीच्या पाण्यावरती!!
  30.  
  31. ओष्टद्वय "ओठांना या मी न लाविली अजुनि सिगरेट"
    "मीही नाही कधी मढविले लालीने ओठ"
  32.  
  33. अरसिक तरुण देखण्या पत्नीसंगे
    कधी न करणे रुसवा भांडण
    अरसिकतेचे, दुर्भाग्याचे
    याहून दुसरे नाही लक्षण!!
  34.  
  35. माणसे आणि मते बापाची गांधींवर निष्ठा,
    लाल बावटा दावी बेटा
    वडील मुलगी समितीवाली,
    रुचली दुसरीला पदयात्रा
    आणि घरातील गडीमाणसे
    संपावरती असती सगळी
    असे आजच्या कुटुंबातली,
    थोडक्यात ही मतप्रणाली!!
  36.  
  37. टिकाऊ धन होईल केवी जगी मानवा प्राप्त दीर्घ जीवन
    शास्त्रज्ञांनो यास्तव झिजवा खुशाल तन मन धन
    त्या आधी पण शोधुनि काढा दिव्य असे साधन
    टिकेल ज्याने चंचल अमुचे बटव्यामधले धन!!

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले