%@LANGUAGE="VBSCRIPT" CODEPAGE="65001"%>
विशाल हे विश्व भल्या बुऱ्यांचे
नसे फुलांचे, नच कंटकांचे
शिरी धरी हे कधी दुर्जनांना
उरी विदारी दुबळ्या जनांना.
जरी टळेना विपदा कुणाला
हवी जगाला मृदु सौख्यमाला.
स्वार्थी अशा या सुखलालसेने
दुणावते दु:ख कुणी न नेणे.
धरी न चित्ती भय तू जगाचे
हसूनि साही शर आपदेचे.
पहा खरे सौख्य तयात राही
सुधाच होई मग आपदाही.
तुझ्यासवे दु:खहि ते हसेल
तुझे मनोवैभव वाढवील.
जरठविवाह ही सामाजिक समस्या हाताळण्यासाठी चित्रपटाच्या तंत्राचा अत्यंत कुशलतेने वापर करुन व्ही शांताराम यांनी 'कुंकू' ही अप्रतिम कलाकृती दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटातील 'अहा भारत विराजे' आणि 'भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे' या दोन गाण्यात वाद्यमेळ वापरलेला नाही. तांब्यावर काठीने आघात करुन दिलेला ठेका आणि शांता आपटे आणि वासंती यांचे सहजसुंदर आवाज यांनी ही गाणी श्रवणीय झाली आहेत. ही दोन गाणी चित्रपटातील असून त्या काळातील शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली होती. 'मन सुद्ध तुझं, गोस्त हाये प्रिथ्वीमोलाची' हे मास्टर परशुराम यांच्या आवाजातील गाणे आजही लोकप्रिय आहे. व्ही. शांताराम यांनी या चित्रपटात Longfellow लॉंगफेलो या कवीची 'Psalm of Life' साम ऑफ लाईफ ही इंग्लिश कविता शांता आपटे यांच्याकडून एका एंग्लो इंडियन संगीततज्ञाच्या मार्गदर्शनाखाली गाऊन घेतली आहे. त्याच पद्धतीचे गीत आठवले यांनीही लिहिले. " विशाल हे विश्व भल्या बुऱ्यांचे, नसे फुलांचे नच कंटकांचे".