पाटलाच्या पोरा जरा जपुन जपुन
अरे, पाटलाच्या पोरा जरा जपुन जपुन.
मी घेऊन माझी गुरं
जाता येताना शेतावर
आम्बेराईच्या वळणावर
का बसतोस चोरा टपुन टपुन
अरे, पाटलाच्या पोरा जरा जपुन जपुन.
तुझ्या मळयातल्या विहिरीवर
मी भरताना रे घागर
पाणी उडवून अंगावर
पदराला नको रे धरू लपुन छपुन
अरे, पाटलाच्या पोरा जरा जपुन जपुन.
कुस्तीचा मारुनी फड,
तू जितून सोन्याचं कडं
येशील मिरवत गावाकडं
रूप बघून जाते राया दिपुन दिपुन
अरे, पाटलाच्या पोरा जरा जपुन जपुन.
ने प्रीत सख्या शेवटा
झाला गावात लई बोभाटा
लावू नका कुळाला बट्टा
लग्नाआधी राया जरा जपुन जपुन
अरे पाटलाच्या पोरा जरा जपुन जपुन.
१९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन, सामान्यांचा त्यांना मिळालेला सक्रीय, धाडसी पाठिंबा अशी राजकीय पार्श्वभूमी, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग आणि "निर्भयतेने जीवन जग" असा संदेश देणारे हे चित्र होते. पटकथा, गीते आणि दिग्दर्शन या जबाबदाऱ्या आठवले यांनी उचलल्या. केशवराव भोळे यांनी श्रीधर पार्सेकर या तरुण संगीतकाराबरोबर आठवल्यांच्या गीतांना संगीताने नटवले. शांता आपटे, बाबुराव पेंढारकर यांसारख्या कसलेल्या कलाकारांसोबत पु.ल.देशपांडे यांनीही या चित्रपटात भूमिका केली होती. तो त्यांचा दुसराच चित्रपट होता.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले