मी नंदनवनी फिरते
जागेपणी अन् उघड्या नयनी
स्वप्न मधुर बघते
नंदनवनी फिरते.
धनुष्य भंगुनी विजयी झाला
घनश्याम मज राम भेटला
त्रैलोक्याच्या लावण्याचे
चरणकमल चुरिते
मी नंदनवनी फिरते.
निळ्या सागरा गंगा मिळली
रामाची मी निळी साउली
दासी होऊनी एकपणाच्या
सिंहासनी बसते
मी नंदनवनी फिरते.
पतिव्रतेला पती हा ईश्वर
कुरवंडीन मी प्राण तयावर
पतीच्या चरणी सुख स्वर्गीचे
सहज मला मिळते
मी नंदनवनी फिरते.
मंत्रतंत्र, भोंदूगिरी करणाऱ्या दुष्टात्म्याच्या कारवायांना बळी पडलेल्या एका दुर्दैवी स्त्रीची ही कहाणी. फसवून लग्न करून दिला गेलेला नवरा बाहेरख्याली. विवाहापूर्वीचे नायिकेच्या स्वप्नदृश्यातले कृष्णभक्तिमय गीत 'नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली', पतीभक्त नायिकेचे 'मी नंदनवनी फिरते' हे गीत, चंगीभंगी नवरा क्लबमध्ये जातो तेथील 'वय माझं सोळा, जवानीचा मळा' हे उडतं पाश्चिमात्य नृत्यगीत आणि 'माडीवर' जातो तेथील 'नका बोलू असे दूर दूर बसून' ही मदमस्त लावणी आणि एक अंगाईगीत अशी विविध गीते आठवले यांनी या चित्रपटासाठी लिहिली आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांनी त्यांचं चीज केलं.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले