चल थरकत मुरकत डौलात रे
खुले धर्तीचा नूर नव्या नवलात रे
चल थरकत मुरकत डौलात रे.
चैतवैसाखाच्या संग, शिणगाराला नवा रंग
आली लगीनसराई थाटामाटात रे.
ज्योतीलागी मिळे ज्योती, दोन जीव एक होती
झरे पिर्तीच्या अम्रिताची बरसात रे.
नेऊ वाजत गाजत, राजा राणीची वरात
गड्या मिरवत चंदेरी रथात रे,
जाईल साडेसाती दूर, येईल कमाईला पूर
जरा खाऊ पिऊ राहू रंग ढंगात रे.
'दहा वाजता' ही रोज रात्री दहा वाजता एकमेकांची आठवण काढण्याचा संकेत पाळणाऱ्या दोन प्रेमिकांची आगळी प्रेमकथा. या चित्रपटातील गीते आधी लिहिली गेली आणि नंतर चाली लावण्यात आल्या. त्यामुळे यातील सर्व गीतांच्या रचना उत्कृष्ट झाल्या आहेत. 'हवास मज तू हवास सखया', 'गोड गुपित कळलंय मला', 'तो म्हणाला, ती म्हणाली', 'चल थरकत मुरकत डौलात रे' या गीतांत गोडवा तर आहेच पण नाविन्यही आहे.
नायकाच्या गीतांसाठी सुप्रसिद्ध भावगीतगायक गजाननराव वाटवे आणि नायिकेच्या गीतांसाठी लीला पाठक यांनी पार्श्वगायन केले आहे. त्यामुळे गाण्यातील कृत्रिमपणा कमी झाला आणि शब्दोच्चार रसानुकुल आणि भावव्यक्ती परिणामकारक झाली आहे. ती खास भावगीते वाटतात. यातील 'तो म्हणाला, ती म्हणाली' या गीतावरून त्या चित्रपटाची जाहिरात 'तो आणि ती यांचे 'ते" अशी केली होती.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले