भाव भुकेला हरी, करीतसे भक्तांची चाकरी
भेटी आला भक्त सुदामा, भुलला त्याच्या भक्तीप्रेमा
दैन्य त्याचे हरी, करीतसे भक्तांची चाकरी.
त्रैलोक्याचा धनी श्रीपती, सुखे होऊनी पार्थसारथी
श्रमे पाण्डवाघरी, करीतसे भक्तांची चाकरी.
भक्त कबीरा कृष्ण कृपाळू, विणू लागतो शेले शालू
बैसुनी मागावरी, करीतसे भक्तांची चाकरी.
अंगण झाडी, जाते ओढी, संत जनीच्या घरी
कावडी रांजणात हा भरी, करीतसे भक्तांची चाकरी.
'संत सखू' हाही प्रभातच्या संतपटांच्या पठडीतील आणखी एक चित्रपट. भक्तीरसातील गीते हे त्या चित्राचेही वैशिष्ठ्य ठरले. या चित्रपटापासून गाण्यांना उसना आवाज देण्यात येऊ लागला. संत सखूचे काम करणाऱ्या हंसा वाडकर यांच्यासाठी विनोदिनी देसाई यांचा आवाज वापरण्यात आला.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले