बंद जाहली दारे
तडफड धडपड पुरे पाखरा, नशिबी कैद तुझ्या रे
बंद जाहली दारे
दाट दाट काळोख चहुकडे थिजले तारे वारे
सरले जीवन नुरले स्पंदन यत्न संपले सारे
सुबक उमलल्या कळीभोवती धगधगतात निखारे
बंद जाहली दारे
निष्ठुर दैवा असा मुका छळ मांडिलास तू का रे
अश्रुंनाही अवसर नाही रडती तेही बिचारे
बंद जाहली दारे
लहानपणी मनात घर केलेले गंधर्व नाटक मंडळीतील वातावरण आणि बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्या 'संयुक्त मानापमान'चा प्रयोग या पार्श्वभूमीवरील, नाट्यसृष्टीचे वैभव पडद्यावर आणणारा 'पडदा' हा चित्रपट आठवल्यांनी फिल्मिस्तानसाठी बनवला. पटकथा लिहिण्यासाठी त्यांनी त्यावेळी उदयोन्मुख असलेले प्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर यांना पाचारण केले. "सहज सोपी कविता मी शांताराम आठवले यांच्याकडे शिकलो" असे त्यांनी उद्गार काढले आहेत. त्यांनी लिहिलेल्या सर्व नाटकांचा अशी सहज सोपी कविता हा अविभाज्य घटक होता.
'पडदा' ही गायक अभिनेता आणि अभिनेत्री यांची अनोखी प्रेमकहाणी होती. चंद्रकांत आणि जयश्री गडकर हे त्या चित्राचे नायक नायिका होते. यातील आठवले यांच्या गीतांना राम कदम यांनी संगीत दिले होते. या चित्रपटाची एकच ध्वनिमुद्रिका मिळाली. त्यामुळे दोन गाणी 'बोलत नाही वीणा' आणि 'बंद जाहली दारे' ऐकता येतील. 'संगीत शाकुंतल' या नाटकातील बरीच गीते खास बालगंधर्वांच्या शैलीत या चित्रपटात सादर केली गेली होती.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले