आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
करू काम, स्मरू राम, मुखी राम हरी रे
प्रानावानि पिर्ती रानी,
जुपुनिया बैल गुनी
कष्ट क्येलं नांगरुनी
द्येवाची स्वारी आली मिरगावरी रे!
धान्याची पेर झाली
लक्षुमिनं किरपा केली
मोत्याची रस दिली
शिवारी पीक डोले राजापरी रे!
नाचत्याती पोरं थोरं
बागडती गुरं ढोरं
चला जाऊ समद्या म्होरं
बिगी बिगी बिगी बिगी गाडी हाकू खळ्यावरी रे !
आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे
करू काम, स्मरू राम, मुखी राम हरी रे
'संत ज्ञानेश्वर' या संत पटात जास्त करुन ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचाच उपयोग केला गेला होता. तरीही 'आनंद आनंद अवघा' हा आठवल्यांनी लिहिलेला अभंग चपखल बसला आणि 'आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे' ह्या खास ग्रामीण थाटाच्या बैलगाडी हाकतानाच्या गाडीवानाच्या गाण्याने मजा आणली.
या चित्रपटाचे वेळी ज्ञानेश्वरीशी झालेली ओळख आठवल्यांनी वाढवली, जोपासली. इतकी की पुढे त्यांनी ज्ञानेश्वरीच्या त्यांच्या अभ्यासातून "ज्ञानदेवीची आराधना" या नावाचा अप्रतिम ग्रंथ लिहिला.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले