आई आई, ए आई
आई आई ए आई
दोनच इवल्या अक्षरात या अमृतसिंधु भरले
आई म्हणजे जगदीशाचे प्रेमरूप अवतरले
आई इतुकी जगात महती देवाचीही नाही
आई आई ए आई , आई आई ए आई.
आईच्या अंकावर पहुडून प्यावा अमृत पान्हा
या मोहातून सुटला नाही त्रैलोक्याचा राणा
आईसाठी राम कृष्णही झाले मानवदेही
आई आई ए आई आई आई ए आई.
आई म्हणजे प्रेमरसाची अथांग गंगामाई
स्वर्गमोक्षही लोळणं घेती आई तुझिया पायी
नकोच मुक्ती कुशीत तुझिया करू डे मज अंगाई
आई आई ए आई आई आई ए आई.
फिल्मिस्तानमध्येच आठवले यांच्या एका सहकार्याने दिग्दर्शित केलेल्या आई मला क्षमा कर' या चित्रासाठी त्यांनी गीते लिहिली आणि त्यात एक ख्रिश्चन पाद्र्याची भूमिकाही केली. राम कदम यांचेच संगीत होते. त्यातील सुधीर फडके यांच्या आवाजातील 'आई आई ए आई' हे गाणे ऐकलेच पाहिजे असे आहे. त्यातील 'नाचते काही तरी गे अंतरी माझ्या नवे' हे द्वंद्वगीत अतिशय वेगळे आणि म्हणून वैशिष्ठ्यपूर्ण आहे. सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी ते गायले आहे.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले