भारतीय संस्कृती ही 'सुखाची लिपी' आहे. (सुखाची लिपी हेही ज्ञानेश्वर महारांजाचे शब्द आहेत) ती जितकी प्राचीन तितकीच श्रेष्ठ आहे. विज्ञानाच्या पलीकडच्या 'प्रज्ञाना'तून तिचा जन्म झाला आहे. पण पिकते तिथे विकत नाही अशी तिची स्थिती झाली आहे. तिचा अभ्यास परदेशात जास्त जोरात आणि प्रमाणात होतो आहे. तेव्हां गंगा उलटी वाहण्याआधीच आपण तिचे महत्व जाणून तिचा डोळसपणे अंगीकार करावा असे आठवले यांना उत्कटतेने वाटले म्हणून त्यांनी या ग्रंथाचा प्रपंच साधला.
आपण रोज सहजपणे करत असलेल्या अनेक गोष्टीत आणि थोतांड म्हणून किंवा वेळ नाही म्हणून अथवा अन्य कोणत्या कारणाने करायच्या सोडून दिलेल्या गोष्टीत केवढा खोल अर्थ भरलेला आहे, त्या गोष्टी किती उपयोगी, परिणामकारक, फायदेशीर आहेत हे हा ग्रंथ वाचल्यावर कळेल. सुख, शांती, समाधान यांच्या शोधात जगभर फिरण्याची गरज नाही, कोणा साधू बाबाच्या नादी लागणेही जरुरी नाही. हरिणाची कस्तुरी त्याच्यापाशीच आहे असेच आठवले यांनी अभ्यासपूर्वक पटवून दिले आहे.
साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा
(You can read, hear and see these and many similar songs)
गुदगुल्या (नर्म विनोदी कविता) (Tickle)
"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"
कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:
"अहा तो क्षण आनंदाचा!" (Moments of Happiness)
दीपावली शुभेच्छा – काव्यभेट (Diwali Greetings)
बालगीते, बडबडगीते (Nursery Rhymes)
इतर भावकविता (Other Poems)
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १
नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2
चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले